जागेअभावी होणारी ठळक बातम्यांची विनोदी तोड-फोड!! (१)

आजकाल सगळ्या हिंदी मराठी न्यूज चॅनेल्सवर तळाशी ब्रेकींग न्यूज देतात. पण त्या जर सरकणाऱ्या (स्क्रॉलींग) नसल्यात तर आणि बातमीचे वाक्य खुप मोठे असेल तर त्या बातमीच्या वाक्याची कशी फोड ( की तोड फोड? ) केली जाते व त्यातून कसे विनोदी वाक्ये तयार होतात ते आपण बघूया. त्या फोडीतील पहिले वाक्य वाचल्यावर पूर्ण बातमीचा अंदाज येत नाही. कधी कधी असे वाटायला लागते की जागा उपलब्ध असतांनाही मुद्दाम उत्सुकता ताणण्यासाठी व प्रेक्षक जास्त काळ टिकून राहाण्यासाठी सुद्धा ही फोड केली जात असावी.

उदाहरणार्थ :

  • दिल्लीत भेट
  • सोनियांशी भेट
  • राणे दिल्लीत
  • पंधरा मिनिटे चर्चा
  • राणे सोनियांना भेटले
  • सोनियांशी चर्चा
  • दिल्लीत चर्चा
  • तपशील गोपनीय
  • सोनियांशी चर्चेचा तपशील गोपनीय
  • राणेंची चर्चा ...

हुश्श्श्श !!! संपली एकदाची बातमी!

खालील प्रकार मी तयार केलेत :

  • अटक
  • ड्रायव्हरला अटक
  • नाशिकजवळ मृत्यू
  • मुलाचा मृत्यू
  • पाच वर्षे वयाचा मुलगा
  • मुलगा पहिलीत
  • पोलीस आले
  • ट्रकने मुलाला दिली होती टक्कर
  • जमावाची तोड फोड
  • नाशिकजवळ अपघात

आणखी :

  • कपडे झाले ओले
  • अभिनेत्री चे कपडे
  • सर्दीवर आता उपाय काय?
  • डायरेक्टरची चिंता
  • तपासणी
  • पाण्याची तपासणी
  • अभिनेत्रीवर टाकलेल्या पाण्याची वैद्यकीय तपासणी
  • आई आली
  • सेटवर हंगामा
  • सेटवर अभिनेत्रीची आई आली
  • तीने केला हंगामा
  • थोबाडीत दिली  
  • डायरेक्टरचा गाल सुजला
  • आईची धमाल
  • सेटवर अभिनेत्रीच्या आईची धमाल
  • सर्दीबाबत जाब विचारले

ही ट्रेन ने थांबणारी आहे. कसा वाटला हा पहिलावहीला प्रयोग? कळवा!

--- निमिष सोनार, पुणे