मुडदूस

वाचल्यावर गझल ही धुसपूस आहे
की, मराठीला तिच्या मुडदूस आहे

एकही माशी न त्याच्या ब्लॉकमध्ये
बाप त्याचा फार मख्खीचूस आहे

ओठ डाळिंबी तिचे नाहीत नुस्ते
बोलण्यामध्ये उतरला ज्यूस आहे

विसर लैला मजनुची जोडी जुनी तू
संगणक तू ,मी तुझा माऊस आहे

माकडिण पिल्लास म्हटली 'नीट बघ-- हा
तू उद्या होशील तो माणूस आहे'

आवरावे तू अता चंबू गबाळे
गझलच्या नावे तुझा धुडगूस आहे