वेदना माझ्या तिला कळतील तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील तेंव्हा...
स्वप्न फिरते सारखे डोळ्यात माझ्या
हात हे हाती तिच्या असतील तेंव्हा..?
आळ येइल पाखरावर कत्तलीचा
मज फुलांचे प्रेत ही दिसतील तेंव्हा
वाटते जिंकून घ्यावे मी जगाला
पण तिच्याशी हात हे लढतील तेंव्हा..?
ठेवुनी बघ हृदय तू हृदयात माझ्या
भावनेला स्पंदने कळतील तेंव्हा..
--------स्नेहदर्शन