दुधावरची साय......

हे जीवन वेगाचं
किती घाईगर्दीचं
माया करतानासुद्धा
घड्याळात बघायचं?

***

हे दिसामासानं
वाढणं बाळाचं
कामासाठी धावणारीनं
कधी कसं पहायचं?

***

इथं..  
       तान्हा ओठंगून
तिथं..
       पान्हा ओथंबून
       कसं हे जीवन?