अं त र

अं त र

बरेच आहे बोलायाचे उद्या कदाचित् नसेलही
शब्दें आहे झाकायाचे
मुकेपणी जे दिसेलही

शब्द बरे गं अर्थ सुचविती जसा आपणा हवा तसा
मौनाच्या गहिर्‍या
वाटांवर मन हे भोळे फसेलही

श्वासाश्वासांहून बरे ना अंतर शब्दाशब्दांचे
नकोच
सलगी, कोणा ठावे? नाते अपुले रुसेलही

ओळख नाही तितुकी अपुली, जरी अंतरी गाज उठे
गृहीत
नियती कुणी धरावी थंडपणे जी हसेलही

नकोस टाकू शब्द परंतू जोडू जैसे दुवा दुवा
अदृष्टाच्या
पटा- पथावर सोबत अपुली असेलही

०८/०८/०८ १२:४५ ए.एम.