येथे प्रत्येकजण असतो
आपापले आवरायच्या मागे
जीवनाची विस्कटलेली घडी
प्रयासाने सावरायच्या मागे...
आयुष्याच्या या धावपळीत
काही क्षण पडतात अडगळीत...
होते स्मरण जेव्हा त्या क्षणांचे
आयुष्य उरलेले असते दोन थेंबाचे
मागे वळून पाहिल्यावर कळते
ते अडगळीतले क्षण जगायचे राहूनच गेले...
मन सैरभैर होऊन ठाव घेते त्या क्षणांचा पण...
भावनांचा बांध तेव्हा होतो अनावर
एकटेच असतो आपण जेव्हा येतो भानावर...