मोकळीच

वाटेस ये कधी या, ती मोकळीच आहे
कोणी न या दिशेला, ती मोकळीच आहे
त्या अडगळीत तेथे, बसले सुरकतलेले
बोलू जरा तिच्याशी, ती मोकळीच आहे
एकेक संपली जर, तु घालता शिवी रे
मग काढ जात त्याची, ती मोकळीच आहे
गेला... तसाच मागे येईल का पुन्हा तो?
आता हवेत भीती, ती मोकळीच आहे
केव्हा न हेच ठावे, वस्ती मि़ळेल जागा
बंदी जरी फितींची, ती मोकळीच आहे
तू... तू... नि... मी... अहंही, आहे नवीन काही?
तू माग आज माफी, ती मोकळीच आहे
झटकून टाक सारे, जे मळभ भोवताली
आहे समोर आशा, ती मोकळीच आहे