नातीगोती
घरासारखे घर आहे, नाहीत नुसत्या भिंती
आहे प्रेम जिव्हाळा, पण नाही नाती गोती
`हम दो हमारे दो" हा मंत्र मी पाळला
जवळी नाही कोणी याचा प्रत्यय मज आला
मुलगी गेली सासरी' ती आहे सुखी संसारी
मुलगा सून गेले दूर आज साता सागरी
आई भाऊ बहिणी सारे आज विखुरले
एकत्रीत सणासुदींचे फॅड आता संपले
कुलाचार कुलधर्म फक्त घोकत राहतो
देवाला नेवेद्य दाखवून मीच माझा खातो
शेजार पाजार उरला फक्त नावाला
ढुंकूनही येत नाहीत आपल्या सुख दुःखाला
जमेल जेव्हा घरात नात्यांची मांदीयाळी
तेव्हा खऱ्या अर्थाने साजरी होईल, दसरा दिवाळी
दसरा दिवाळि.
- अनंत खोंडे
ही कविता अनंत खोंडे म्हणजेच माझे सासरे यांची स्वतःची कविता आहे. मी त्यांचे मनोगतवर अकाऊंट उघडायचा प्रयत्न केला पण यश आले नाही. याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?
कवितेविषयी काही प्रतिक्रिया असतील तर दुवा क्र. १ या अकाऊंट वर पाठवणे.
धन्यवाद
- मनुली