नको लावूस पारिजात दारी
==============================
नको लावूस पारिजात दारी..!
बावळा, फुलतो रोज नव्यानी..!!
कळी-कळीत, मोती-पवळी..
वेंधळा, सांडत राहतो अंगणी..!
टप-टप बरसती गंधीत सरी..
कोवळा, भिजतो श्रावण राती..!
आकाशी विझती चांदणं जोती..
सोवळा, रचतो निर्माल्य राशी..!
चौकटीत पाखरे गलबलती..
सावळा, ऐकतो निरव वाणी..!!!
==============================
स्वाती फडणीस.......... १६-०९-२००८