* कातरवेळची एक आठवण *
मातीच्या त्या भिंती,
कुडाची ती घर,
मनातून जात नाहीत,
ही आठवणींची फुलपाखर!
बंगल्यापुढे गेट असते,
बांधकामात असतो आधुनिकतेचा कळस,
पण अंगण येथे दिसत नाही,
आणि दिसत नाही तुळस!
उडून गेलेल्या छपरावर आता,
उगवू लागली हिरवळ,
जात्यावरली गाणी आता,
येत नाहीत कानावर!
हरवलेली विट्टी आता,
शोधत नाही कुणी
भेंड्या लावून येथे कुणी,
म्हणत नाहीत गाणी!
संगीताला परिस-स्पर्ष त्याकाळी,
होत असे कण्ठाचा,
पंण घशातून गुरगुरणे व धांगडघिंगा
हा आत्मा झालाय आजच्या संगीताचा!
देवाच्या पायावर डोक ठेवताना पुर्वीसारखा
दाटून येत नाही उमाळा,
लवकर पुढे चला! असा,
भटजी देतो आदेश सोवळा!
एस. टी. ची वाट पाहण्यात आता,
राहिली नाही गावाकड जाण्याची हुरहुर,
कातरवेळी लक्षात येत,
जीवनातील प्रवासात या माझ घरट राहिलय दुर!
--अनिरुद्ध