स्वप्नसुंदरी
हातात हिरव्या बांगड्यांचा
चुडा भरला होता,
तोच हात मेंदीने,
तेव्हा रंगला होता!
नथनीचा तुझा त्यावेळी
डौलच न्यारा होता,
गालावरील लालीचा
रंग लाजरा होता!
डोळ्यांमध्ये निरागसता
पराकोटीची जपलेली,
गोष्ट माझ्या प्रेमाची
तव ओठी लपलेली!
वाळवंटातही कोठेतरी
हिरवळ थोडी असावी
रखरखत्या या जीवनात माझ्या
सावली तुझी मिळावी!
अनिरुद्ध