... "काय, काकी?"

आमचे प्रेरणास्थान : ... काय बाकी?

.......................................
... "काय काकी? "
....................................

जुन्या तनूला डब्यातली लावली तकाकी...
हसून कुत्सित कुणी विचारेल, "काय, काकी? "

हळूच संकोचशील, बघशील फक्त खाली...!
किती अशी थापशील गाली थरात लाली?

असून निस्तेज नेत्र, कांतीस सुरकुत्याही...
अजूनही पण भरात येणे सुटे न काही!

दुखून गुडघे जरी तिच्या मंद  हालचाली...
तरी, पहा, शिंग मोडुनी वासरात आली!

स्थिरावतो मेद त्या शरीरावरी जसजसा...!
जडात चैतन्य आणण्याची सुचे अवदसा...!!

तुलाच ऐन्यात रूप बेढब तुझे दिसावे...
मिटून डोळे स्वतः:कडे पाहताच घ्यावे...!

जुनी हवेली.... जुनी हवेलीच पडकिशी तू...
खरेच होशील ढेर... बसल्यावरी ढुशी तू!

"जिवात जर का तुझ्या नवा एक जीव आला...
स्वतः:प्रमाणे करू नको खोडसाळ त्याला!! " 

- खोडसाळ

....................................
रचनाकाल ः ३ ऑक्टोबर २००८

रचनाकालाविषयी प्रतिसाद आल्यास प्रथेनुसार पानभर अगम्य उप-प्रतिसाद देण्यात येईल हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे.

-हुकुमावरून

....................................