अर्थात मी ही कविता मुलांना उद्देशून लिहिली आहे, online मित्रांशी बोलताना जाणवते ना, के त्यांना त्यांची मैत्रीण कशी हवी ते, सहज आणि कल्पनेनेच लिहिली आहे, कोणाला दुखवणे हा हेतू जरासुद्धा नाही आहे हं..
एक प्रेयसी हवी
माझ्यासोबत कधीच
जास्ती हट्ट न करणारी
तरीही केव्हातरी
माझे लाड- हट्ट पुरवणारी
आणि हळूच
माझ्या मनात शिरून
मी न सांगता
मनातले भाव ओळखणारी
आणि हो
तिने थोडा हट्ट केला तरी
माझ्या मनवल्याने
चटकन गप्प बसणारी
अशीच हवी मला प्रेयसी