आज ही तू डोळ्यासमोर पुर्वीसारखाच
चेहऱ्यावरचे निर्व्याज हसणं
लाघवी बोलणं
आज ही मनाला गुंतवून ठेवतं
या प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही अगदी शोधूनही
प्रश्नांवरून आठवलं
तुझ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे
मला देताच आली नाहीत रे अजूनपर्यंत
तू सप्तपदींपेक्षाही दूर दूर अशा वाटेवर आहेस
मी एकटीच तळमळतेय
तुझ्या वाटेवर डोळे ठेवून
तु येशील ही आशा
अजूनही जागते आहे मनात
कटू आठवणींसामोर मी डोळे बंद ठेवते
कडवेपण जाणवत नाही अशाने या संवेदनशील मनाला
हळव्या मनात जतन करून ठेवलेल्या सुखद आठवणीं आठवल्या तरीं
मनावर अलगद मोरपिस फुलल्याचा भास
मला माझा सोबतीं वाटतो
न परतींच्या वाटेवरहीं
पुनर्जन्माचे, चमत्काराचे
अंकुर तग धरीत आहे
उमलत्या स्वप्नांतही तू अजून डोळ्यांसमोर.....
आज ही तू डोळ्यासमोर पुर्वीसारखाच...