नदी

उन्हाळा शिरी झेलता शांत झाली
नदी वाहता वाहता शांत झाली

कशी डोंगरावर खळाळून वाही
नदी नांदता नांदता शांत झाली

कुणी पाट काढी, कुणी बांध घाली
नदी आटता आटता शांत झाली

किती सागराशी नदीने लढावे
समर्पण ठरे सुज्ञता, शांत झाली

"सरी होउनी डोंगरा भेटण्या मी .... "
गळा दाटला, बोलता शांत झाली

दिसो डोंगराला न डोळ्यात पाणी
करे गोष्टिची सांगता, शांत झाली ...