झांगडबुत्ता

२००१ च्या कॉलेज स्नेह्सम्मेलनासाठी साठी लिहिलेली कविता.....

काय सांगू राजेहो गोष्ट झाली भारी

अन वर्गातली एक पोरगी मले लागू लागली प्यारी..

काय सांगू राजेहो मी तुमाले तिच रुप

तिच्या रूपापायी येडे झाले जण खूप..

गोरे गोरे गाल तिचे लयच झाक लागे

पायता तिले माय मन धकधक करे..

पायता तिच्या गालावरची खळी मले लयच झकास वाटे

ती वर्गात नाय आली की लयच भकास वाटे..

तिच्या पिरमात मी लईच झालो दिवाना

माया सुखी जीवनाचा तीन करून टाकला धिंगाणा..

म्हणून ठरोल एक दिवस सांगतो तिले मनाची बात

माया पिरमाची तिच्या मनात लावतो वात..

एक दिवस एकटी पाहून तिले रस्त्यात गाठलं

बोलायचा पयला चानस म्हणून मले कसंसंच वाटलं..

मले पाहून ती म्हणते "भाऊ" तुम्ही इथं काय करता?

लवकर बोला कारण मले येळ नाही पुरता..

तिच्या तोंडून  "भाऊ" शब्द ऐकताच बसला जोरदार धक्का,

"भाऊ" बनवून माया तिने कटवला हो पत्ता..

तेव्हापासून राजेहो माया प्रेमाच्या नगरित मल्लिकेचा नाही पत्ता

पयल्यांदा कराले गेलो पिरेम न झाला झान्गड्बूत्ता..