आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली;
तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु.
येते अशी घडी की ध्यानात रानवारा;
तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १.
जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता;
नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २.
तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती;
श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.