श्रावण हिरवा

श्रावण हिरवा धुंद मनात

       धुंद मन गुंतलं कुणात?

कुणीतरी कुजबुजलं हलकंसं

       हलकेच जिवाला फुटली पिसं

पिसासारखा मऊ शहारा

      शहाऱ्यातही मोहरतो वारा

वारा वेडा पिसाट खेळतो

      खेळ मांडून डाव मोडतो

मोडला डाव मांडायला हवा

      मांडो आला श्रावण हिरवा!