अज्जे अज्जे ऐक जरा..

अज्जे अज्जे ऐक जरा..

===================

अज्जे अज्जे ऐक जरा..
तुझा आशीर्वाद असूदे!
रूप तुझे मिळूदे..
सुंदर मला बनूदे..
नाक डोळे नाही गं!
तुझ्या सारखं हसूदे..!!

अज्जे अज्जे ऐक जरा..
तुझा आशीर्वाद असूदे!
तुझ्या इतकं मोठ्ठेपण
मलाही मिळूदे..
वय वर्ष नाही गं!
आकाश बनता येऊदे..!!

अज्जे अज्जे ऐक जरा..
तुझा आशीर्वाद असूदे!
तुझ्या सारखी एक पोटली
माझ्या कडे असूदे..
धन दौलत नाही गं!
थेंब बनून बरसूदे..!!

अज्जे अज्जे ऐक जरा..
तुझा आशीर्वाद असूदे!
तुझ्या हातातलं तिकिट
मलाही मिळूदे..
विमान बिमान नाही गं!
मन पिसाच होऊदे..!!!

===================
स्वाती फडणीस..... १३-११-२००८