खरी कविता आहे कुठे माझी?
केव्हाची शोधतोय....
दिसताहेत सर्वत्र शब्दांचे ढिगारे,
अर्थाचे अट्टाहास अन अनुकरणाचे रतीब
अस्पष्ट विचारांचे तण, साक्षरतेचे तोरे
आंदण मिळालेल्या कुठल्याशा इझमचे टेंभे
तर कधी गाणे करण्यासाठी केलेली तडजोड
कधी तंत्राचे गळफास
या गदारोळात हरवलेली...
अजून सापडत नाही...