कोरडे अश्रू जहाले, नेत्रांतुनी या रक्त वाहे
जाहली वाचा मुकी अन् लेखणीही शांत आहे
झाल्या किती जखमा उरावर नाही कधी फिरलो मि मागे
पाठीवरी का घाव झाला याचीच केवळ खंत आहे
कोळून प्यालो मी पुराणे, बैबल, कुराण् अन् वेद ही
पुन्हा धाड खिलजीची येता, का नालंदा जळत आहे ?
शिकविली मी शांतता, समता, प्रेम अन् बंधुता
समजले ते भीरुता ही, दोष माझा ह्यात आहे ?
समरांगणी मी मूढ झालो कोणासवे हे युद्ध आहे ?
कृष्ण सारथ्यास नाही एकटा अन् पार्थ आहे
आता तरी तू ऊठ मित्रा, जग पाहा जागेपणाने
आताच पुरुषार्थास जागव, अन्यथा मग मौत आहे
ब्रह्मतेजे, क्षात्रतेजे, उठुनि उभा राहीन मी
दुश्मनांचा नाश करण्या, आता मि केवळ शाक्त आहे