एकेक प्यादे

एकेक प्यादे, जपून जपून
एकेक ओळ, आखून आखून

खुळे नि सोवळे, अध्यात मध्यात 
जात्याची घरघर, दिशा दिशात

चित्र अजाण, लाजते लाजते
रंग प्रवाही, वाहते वाहते 

मोर पिसारा, खुलता खुलता
पाय बिचारा, नटवा नटवा

एकेक प्यादे, पायात पाय
चौसष्ठ घरटी, अडवत जाय