जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं
कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं

का पाहतेस प्रिये स्वप्नं सुखी संसाराचे
ए, कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं

का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर
तीने खर तर केव्हांच घर बदललं होतं

का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे
इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं

जरा हळू बोल असं जगाने बजावलं मला
बजावतानाही ते किती मोठ्याने किंचाळलं होतं

का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा
कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं

का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो
जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

@सनिल पांगे