माझ्याच तऱ्हा

माझ्याच तऱ्हा
===========================
.
.
सांभाळलेला गारवा..
सांभाळलेला झरा..
अन तो सांभाळलेला कवडसा..
नाहीच मुळी मजहून वेगळा.
.
मीच गारवा मीच झरा.
ऊन कवडसे माझ्याच तऱ्हा!!
अवखळ वेल्हाळ धबधबा
लागला आता सपाटीला.
.
खंडी खंडी गाळतळा
माझ्याच मी दाबला.
एक प्रवाह अन किती धारा..
ओळखेना माझॅ मला!!
.
तो पहिला वेगळा
माझा थेंब कोणता?......
.
.
==========================
स्वाती फडणीस......................   २००७