तुझे हात नाग गळ्याभोवताली
सुर-केवड्याचे रान बहरून आले
देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे
सुखाचा बसे काळजास दंश
शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे
विष-वादळानंतर उरे दगडदेह
अन मन पिसापरी तरंगणारे
चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे