" खुपदा मनाशी ठरवलं
तुला कहीच नाही सांगायच,
कितीही ओठापर्यंत आलं
तरीही मनातच ठेवायचं;
माझं तुझ्यावर प्रेम आहे
सांगायचं धाडसच नव्हतं माझ्यात,
तरीही तुझ्याशिवाय नव्हते
कोणीही माझ्या आयुष्यात;
तुला भावना कळाल्या नाहीत
चुक तुझी नसेल,
यावरून तुला वाटते
माझं प्रेम खोटं असेल;
एवढे दुःखं मिळाले की
दुःखाला सुख म्हणावे लागले,
मिळालेल्या दुःखातून कितीदा
खोटेच हसावे लागले;
माझं प्रत्येक दु:ख
कवितेतून प्रकट होतं,
मला कल्पनाच नव्हती
कवितेला याचं किती दुःख होतं!!! "