शब्द मांडले उगाच त्यांचे चळणे अर्थाला
खेळ होतसे हशील नाही छळणे अर्थाला
घेतले कुठे अनुभव सांगा पुरते माझे मी?
वाटते,नको पुन्हा पुन्हा अडखळणे अर्थाला
जाणवे मला हवेच आहे जगणे जमायला
सोपवीन माझे त्यानंतर कळणे अर्थाला
फक्त एकदा जगून बघ रे दुसऱ्यासाठीही
तेच कदाचित सुरू तुझेही वळणे अर्थाला
मित्र तुझा हो तूच रे गडुया, उलगड मनातले
पोचले न पोचले शब्द का दळणे अर्थाला?