मनाच्या डोहात खोल खोल तुझ्या आठवणी…
रानातून वाहता ओहोळ तुझ्या आठवणी…
फेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…
स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…
मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…
तुझ्याइतक्याच हळव्या तुझ्या आठवणी…
राहून राहून छळव्या तुझ्या आठवणी…
करतात भावविव्हल तुझ्या आठवणी…
तरीही राहू देत जवळ तुझ्या आठवणी…
माझ्या प्रीतीचं इमान, तुझ्या आठवणी…
तू नाहीस… किमान तुझ्या आठवणी…!
– अभिजीत दाते