एका वळणावर...

भेटलो होतो एका वळणावर,

सुर जुळले, मनं जुळली...

पण वाटा वेगळ्या झाल्या अन

तू गेलीस तुझ्या वाटेवर

मी मात्र वाट चाचपडत होतो.