समर्पण!

"थांब सरिते, थांब पाहा आलो!

प्रीत गंगेमाजी सदा नहालो!

गात आलो मी, मस्त मस्त गाणी,

 तुजसासाठीच आणिले सर्व पाणी"

प्रातिसादाची वाट ना पाहता,

झरा आटला की वहाता वहाता!

दिले त्याने सर्वस्व झोकुनिया,

न उरे अस्तित्व, उरे फक्त काया!

कुणा ठावे कुठुनी मार्गी आला,

काय अर्पोनी कुठे कसा गेला?

सरितेला जाणीव ऐसी नाही

तिज ओढ विशाल सागराची!

एकतर्फी ही प्रेमरीत न्यारी,

जगी कवणाला कळणार मात्र नाही!

झरा आता मुळी नाही उरला,

समर्पण भावे जगी अमर झाला!

झरा असा प्रती पावसाळी येतो,

सरितेला सर्व समर्पण करितो!

रीत त्याची किती युगायुगांची,

जग-रहाटी म्हणून बघायाची!