दुःखभारित रौद्रक्षणांचे , सदैव स्वागत माझ्या येथे /
दुःखे येती जेव्हा अवचित, सुखागमनही तेव्हा निश्चित!
शिशिरापाठी वसंत येतो, रात्रीमागून दिवस उगवतो/
पुत्रमुखाचे दर्शन घेण्या, माता साही प्रसाव-वेदना!
आनंदाच्या ठेव्यासाठी, कळ थोडीशी सोसा पोटी /
सृष्टीचा हा नियम चांगला, स्वीकारावा सुखे आपुला/