मुके भोग

कढ वेदनेचे प्याले मी जे तू दिलेले

घेतलेस तू सुख  ते माझ्याच यातनांचे

सदैव  केला मी प्रयास उजळायचा घर तुझे

अश्रूंनी माखले काजळ ते माझ्याच नयनांचे

दुर्दैव हे सोसते घाव ते माझ्या चुकांचे

ओठांत स्वर दबले  ते माझ्याच हुंदक्यांचे

 नाही मी अबला जशी तुला वाटते

चौकट ओलांडून गेले ते ठसे माझ्याच पावलांचे

कधी न कळले मला काय मी शोधीत होते

एवढेच खरे मुके भोग ते माझ्याच नशिबाचे