असे नव्हतेच होते व्हायचे...

संस्कारांच्या वेली जेव्हा करुणा भाकत होत्या
व्यसनांच्या कुदळी गर्वाने जिवणी फाकत होत्या

जलपर्णीखाली पाण्याचे डबके झाले मन हे
घट्ट मुळांच्या भुंड्या ओळी अनुभव झाकत होत्या

लाख अपेक्षा दुनियेच्या निर्जीव मेंदुला करुनी
विचारधारेची, कृत्यांची पलटण हाकत होत्या

अभिमानाच्या पोलादी फासळ्या हुषारी करती
जितक्या मी वाकवेन त्याहुन जादा वाकत होत्या

आल्या सुखांसवे वेदना, सुखे निघाली तरीही
पाय टाकल्यावर निघण्याचे नावच टाकत होत्या