का 'लागतात' अजुनी?

पुतळे उभारलेले का लागतात अजुनी?
चेले जुनाटलेले का लागतात अजुनी?

नावीन्य शोधताना थकलो तुझ्यात, मी ही
कपडे उधारलेले का लागतात अजुनी?

दुनियेत राम नाही, आहेस जाणलेले
थकवे उगाळलेले, का लागतात अजुनी?

षंढास वासना हो, बघुनी दलाल नाचे
तुजला गळाठलेले का लागतात अजुनी?

आयुष्य सर्व मित्रा, माझे तुझेच आहे
परकेच भाळलेले, का लागतात अजुनी?