शांत मावळतिच्या वेळी
तु असावी सोबती
हात तुझा हाती असावा
अन प्रीत असावी अबोली
तुझ्या नजरेतुन बघावा
तो दूर क्षितिजावरचा सुर्य
तुझ्या श्वासातुन अनुभवावा
मम जीवनाचा अर्थ
आणि अशातच
तुझा परत जाण्याच बोलण
क्षणात माझ तुझ्यापासुनच वगळेपण भासवत
तुझ मी परत येण्यासाठीच जाते सांगण
पुन्हा तुझ्यातच जगण्यास सांगत.