अमिताभ बच्चन आणि त्याच्या करोडो पंख्यांना समर्पित....
स्टार स्टारांचा खरा... अमिताभ बच्चन
कोंदणामधला हिरा... अमिताभ बच्चन
सिलसिला, जंजीर, शक्ती, डॉन, शोले
करमणूकीचा झरा... अमिताभ बच्चन
अग्निपथ, दीवार, खाकी, ब्लॅक, आंखे
अभिनयाच्या सागरा... अमिताभ बच्चन
चोपडा, मनजी, मुखर्जी, मेहरांचा
फक्त एकच आसरा... अमिताभ बच्चन
तोल नात्यांचा घरी सांभाळतो जो
ऍशचा तो सासरा... अमिताभ बच्चन
कोणतीही चीज हातोहात खपते
ऍडमध्ये वापरा... अमिताभ बच्चन
स्क्रीन वर येताच बघ व्यापून उरतो
कोपरा अन कोपरा... अमिताभ बच्चन
खान, खन्ना, दत्त आवडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अमिताभ बच्चन