युरेका युरेका

युरेका युरेका
---------------------------------------------------

अता युद्ध होईल नक्की निकाली, युरेका युरेका..

उरलीत शस्त्रे तुटल्यात ढाली, युरेका युरेका..

मला पाहुनी ती अशी लाजली की तुम्हा काय सांगू..

अभंगातुनी मज स्फुरली कवाली, युरेका युरेका..

तिचे सज्जनांशी होतेच तंटे कळता मला अन..

जमले मला ते बनणे मवाली, युरेका युरेका..

नवे दु:ख येता निवार्यास माझ्या म्हणालो स्वतःशी..

सुन्या जिंदगानीत नवी जान आली, युरेका युरेका..

जुन्या त्या लढ्याला हुतात्मा मिळाला अखेरीस कोणी..

चला क्रांतीला ह्या सुरवात झाली युरेका युरेका..

तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी..

पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका..

जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी..

तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका..

------------------------------------------------
- योगेश जोशी(बंगळूरु)