कधीतरी मी...

तिचे चालणे.. तिचे बोलणे.. मंद हवेसम तिचे डोलणे
तिचे हासणे, तिचेच रडणे.. माझा जीवही तिजवर जडणे
तिचे ऐकणे, तिचे सांगणे.. देवापुढती तिला मागणे
तिच्याचसाठी (दिवसा झोपून! ) सारी सारी रात्र जागणे..

तिच्या मुलायम केसांमध्ये मन माझे ते गुंतून जाणे,
तिच्या रूपेरी चेहऱ्यासम ते सुंदर सुंदर सप्न पाहणे
तिच्या घराच्या रस्त्यावरूनी उगाच माझे येणे-जाणे
तिच्या सुरांच्या सुरावटीला जुंपून देणे जीवनगाणे.....

...अजून तिच्या त्या आठवणींनी व्याकुळ, हळवा थोडा होतो,
कशास तुम्हा खोटे सांगू..
कधीतरी मी वेडा होतो !

कधीतरी मी वेडा होतो !!!

+++++++++++++++++++++++++++++++++