तूं व ती

तुझा माझ्याशी अबोला फार शेफारला आहे ।

तिचा शेजार मात्र माझ्यासाठीच आसूसलेला ॥

तुझी नजर कां कोण जाणे आग ओकीत आहे ।

तिचे नयनशर मात्र माझे हृदय गोंजारणारे ॥

जुन्या प्रेमपत्रातील तुझ्या फितुर झालेली अक्षरे ।

तिचे मुग्ध मौन मात्र सदा माझेच गीत गाणारे ॥

तूं मिठीत वाहिलेल्या शपथांना वंचनेची फिकिर नाही ।

तिचे मूक समर्पण मात्र माझी श्रद्धा जोपासणारे ॥

तुझ्या मनातिल संशयाला मृगजळाचा वेग आहे ।

विश्वास तिच्या मनातिल माझाच भरवसा ठेवणारा ॥

आनंद तुझ्या मनातिल बेचैनीत कुढतो आहे ।

तिच्या रोमरोमात मात्र हर्ष असीम बहरणारा ॥

अपराधीपणाची चिंता मन माझे पोखरित होती ।

खऱ्याखोट्याचा कर तूं निवाडा तोच तुझी सुटका करणारा ॥