निळ्या निळ्या पाण्यात निळे निळे आकाश,
निळ्या निळ्या पाण्यावर चमचमणारा प्रकाश,
निळ्या निळ्या पाण्याची नागमोडी वाट,
निळ्या निळ्या पाण्याचा हिरवा हिरवा काठ,
निळ्या निळ्या पाण्यात तर्रगणारे मासे,
निळ्या निळ्या पाण्यात जगही निळे दिसे,
निळ्या निळ्या पाण्यात तरर्गणारे लव्हाळे,
निळ्या निळ्या पाण्याचे ओले ओले जिव्हाळे,
निळ्या निळ्या पाण्याची न्यारी न्यारी गोष्ट,
निळ्या निळ्या पाण्यासाठी किती किती कष्ट.