गणिका

एक गणिका म्हणून जगताना;

मला माझ्यातली मि गमवाया लागली;

माझ्या जगण्यालाही मला;

श्वासांची किंमत मोजाया लागली.

कोणीतरी लावायचं माझ्या शरिराची किंमत;

स्वतःच्या आशाळभुत नजरेच्या बाणांनी;

पण माझ मनं मात्र वेडं;

कोठेतरी किनाऱ्यावर जाउन बसायचं.

प्रत्येक रात्रिनंतर एक पहाट असते;

या आशेवरच माझ अन मनाच युद्ध संपायच;

अन शरीर नाइलाजाने का होइना;

पण परक्याच्या स्वाधीन व्हायच.

मग सुरू व्हायचा नकळत;

नको असलेल्या स्पर्श आणि भावनांचा खेळ;

माझ्या स्वप्नातल्या जिवनाचा येथे;

कोठेच बसत नसायचा मेळ.

आयुश्यात घडत गेल्या चुका;

कधी कळत तर कधी नकळत;

म्हणुनच मला माझ्या शरीराचा;

बाजार मांडाया लागला.

अजुनही मिटल्या पापणीआड मी एक स्वप्न जपलय;

येइल कोणीतरी मला स्विकरणारा माझ्या वेड्या मनासहित;

म्हणुनच मि नव्याने उभारी घेते;

माझ्यातली मीच विरघळून जाताना.