पाऊस वेगळा सजणा, हा पाऊस वेगळा आज,
नभातून कोसळताना, नभालाच वाटे लाज. || धु ||
आपुल्यात होते अंतर, अंतरात प्रीतीचा मतंर,
त्या मंत्राच्या गुणगुणण्याला, चढला शरमेचा साज. || १ ||
सांगू आता कुणाला, मी मोडली अशी रीत,
अधीर झाली प्रीत, फिरला आतला आवाज. || २ ||
त्या मुग्ध सांजवेळी, देहात सणाणली बिजली,
देव्हाऱ्यातली वात विजली, त्या क्षणाला नाईलाज. || ३ ||
- अनुबंध