सोडल्यानंतर

कुणास ठाऊक की असे का मनात आले?
मनात यावे तुझ्या जसे या मनात आले

तुझ्या मनाला नसेल काहीच काम आता
असे दुपारी उगाच माझ्या मनात आले

असायचा नाइलाज आहे म्हणून आहे
मरायचे तर कितीक वेळा मनात आले

तुझे तिथे चालले असावे निवांत सध्या
निवांत चालू नये असे का मनात आले?

उगाच व्याख्या नवी नको ऐकवू सुखाची
तुला तुझी ना पटेल व्याख्या, मनात आले