मारले घारीस काही पारव्यांनी
पिंजर्यामध्ये सिकंदरश्या थव्यांनी
वर्ण केले चार जेव्हा आपल्यांचे
शोधला त्यांचा मनू मग पाचव्यांनी
आपला पत्ताच सूर्याला मिळेना
काढली आकाशगंगा काजव्यांनी
ओढतो आहेस त्यांची वात सध्या
साजरी झाली दिवाळी ज्या दिव्यांनी
काढली कोणी जरा शोधून काढा
वाट जी चोखाळली आहे नव्यांनी