आयुष्य असते एका उंच शिखरासारखे
सुखदुःखाच्या दऱ्यांनी वेधलेले
शिखर चढणारे आपण सगळे
एकमेकांचे सहप्र'वाशी असतो
हे शिखर चढताना आधार असतो
मैत्रीचा, प्रेमाच, ईर्ष्येचा
मागे वळून बघताना आनंद असतो
यशाचा, काहीतरी मिळवल्याचा
पुढे बघताना धीर असतो
पुढचं पाऊल जपण्याचा
ठेचा तर लागतच असतात
पण वाऱ्याची संथ झुळूक
प्रोत्साहन देतच असते
यशाचे अभिनंदन करायला
पावसाची थाप पाठीवर असते
आणि मनातली हिरवळ
बहरून आलेली असते
पण हे अनुभवण्या आधी
आपणच आपल्याला जपायचे असते...