राहु दे असेच केस पावसात मोकळे
मोहुनी त्यानाच कशी मोतीसर ओघळे
नाचू दे डोळ्यातले मोर धुंद अन खुळे
भिजलेली तान आर्त घे तूही कोकिळे
श्वासातिल गंध ओला मन धुंद होउ दे
काळजात कळ वेडी हाच छन्द होउ दे
कोसळु दे सर तुझ्या उधाणल्या गात्री
ये मिठीत वीज होउन पावसाच्या रात्री