पण चुकून......
तिच्या आईला वाटायचे की, मुलगा व्हावा,
पण चुकून "ती" जन्माला आली.
तिला वाटायचे की, खुप शिकावे, खुप मोठे व्हावे,
पण चुकून, तिचे लग्न झाले.
तिला नेहमी वाटायचे की, नवरा असावा चांगला, प्रेमळ,
पण चुकून, "तो" नालायक निघाला(! )
तिला वाटायचे कि, आपला मुलगा आपली खुप काळजी घेईल, आपल्याला जीवा पाड जपेल,
पण चुकून, त्याने आपल्याच आईचा जीव घेतला(? )
असच तिचे आयुष्य घडत -बिघडत गेल,
पण चुकून(!!!).