चूक

कधीतरी कुठेतरी मी चुकत गेलो;

हे  मला कधीतरी चुकूनच कळलं;

अन या चुका दुरुस्त करण्यासाठी ;

मी आयुश्यात पुन्हा नकळत चुकत गेलो.

जीवन आता साचल्यासारखं वाटतंय;

पण प्रवाहाची मला अपेक्षाच नाही;

कारण घुसमटलेल्या माझ्या मनाला;

जगण्याची कसली आशाच नाही.

रात्री झोपतानासुद्धा माझे;

डोळे सताड उघडेच असतात;

वटवाघळासारख अंधारात ;

चुकांची कारणे शोधत राहतात.

आयुष्यातल्या दुखऱ्या जागा;

अशाच अवेळी ठसठसतात;

आवरून धरलेल्या अबोल भावनांना;

डोळ्यांवाटे बांध फुटतात.

आयुष्य कितीही नको असलं ;

तरी ते जगावंच लागत;

संपवता  येत नाही म्हणून;

नव्याने सुरू करावंच लागतं.