सजल झाले नेत्र माझे ते तुला दिसतील का?
एकदा विश्वासले जे ते पुन्हा फसतील का?
हाय ती वचनेही खोटी आणि खोटे प्रेमही
कोरले हृदयांतरी जे शब्द ते पुसतील का?
स्मरते तुला का जिवलगा ती रात्र अजुनी चांदणी?
अधीर होती स्पंदने जी ती आता असतील का?
भंगले सुखस्वप्न माझे पार ठिकऱ्या जाहल्या
कल्पिली होती सुखे जी ती कधी हसतील का?
मी कशाला, का करावी आर्जवे आता तुझी?
भावना तुजलाच होत्या त्या मला नसतील का?