आशा

माणूस मेला तरी आशा मरत नाही
जळून राख तरी आशा सरत नाही

             भाकरीच्या आशेवर दिवस अख्खा घाम पितो
             उचपटून येता हाड तरी भूक काही सरत नाही

चौका चौकातल्या नजरा भुकेचाच भाग आहे
कितीही हाड म्हटलं तरी कुञ माघे फिरत नाही

             सुटलेली गोलाई पुढारिपणाची निशाणीच ती
             बाप म्हणतो थांब तरी पोर माघ फिरत नाही.

हि आशाच म्हणे संसाराची जननी आहे
पोर मरता टपा टपा माय काही मरत नाही.